औरंगाबाद : जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसर व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन, पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.पैठणच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत अरण्यम पद्धतीने कातपूर येथे वृक्ष लागवड प्रकल्पाचे उदघाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य वन संरक्षक सत्यजित गुजर, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, विभागीय वनाधिकारी किर्ती जमदाडे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाले, एन. व्ही. पाखरे, पैठण वन परिक्षेत्र अधिकारी गंगाधर सातपुते, औरंगाबादचे अनिल पाटील, सोयगावच्या नीता फुले, तांत्रिक सल्लागार मेघना बडजाते, आदी उपस्थित होते.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, अरण्यम प्रकल्प दिशादर्शक ठरावा, असे 300 प्रकारच्या वृक्ष प्रजाती लावण्यात येत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांची पैठण ही पावन भूमी आहे. येथे भाविक बहुसंख्येने या ठिकाणी येतात. पर्यटक, पक्षी प्रेमीही येतात. अरण्यम प्रकल्प पर्यटन स्थळ, दुर्मिळ वृक्ष जातींचे परिचय केंद्र तथा संग्रहालय म्हणून विकसित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र अभ्यासकांना तांत्रिक अभ्यास, संशोधनासाठी संदर्भीय स्थळ म्हणून उपयोगी ठरेल. घन-वन वृक्ष लागवडीने मानवासह पशु, पक्षी, कीटक यांसाठी हा हरित भवितव्य निर्माण होऊन जैवविविधता संवर्धन होईल. पक्ष्यांच्या अधिवासाने, येण्या जाण्याने विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लागवड होतील, असेही चव्हाण म्हणाले. तदनंतर त्यांच्या हस्ते अरण्यम घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले