वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे
वैजापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी मागील दहा वर्षापासून अतिशय पारदर्शक पद्धतीने निवड करून प्रत्येक केंद्रातून एका शिक्षकाची निवड करून हा पुरस्कार दिला जातो.खंडाळा केंद्रातून हा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखखंडाळा शाळेचे उपक्रमशील शिक्षक रविंद्र हरिदास वारुळे यांना प्रदान करण्यात आला. या शिक्षकाची निवड केंद्रप्रमुख बबनराव तगरे व केंद्रीय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केली.मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण, शिष्यवृत्ती, विज्ञान प्रदर्शन यामध्ये चमकलेले विद्यार्थी यामुळे शिक्षक वारुळे आर. एच. यांची निवड करण्यात आली.
लाख खंडाळा हे गाव वैजापूर तालुक्याचे शेवटचे गाव या गावात गेल्या 11 वर्षापासून कार्यरत शिक्षक रविंद्र वारुळे यांनी लाखखंडाळा गावातील शाळेचा मोठा कायापालट केला. शिक्षक वारुळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीने लाख खंडाळा शाळा इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंत असूनही विज्ञान प्रदर्शनात शाळेला तालुक्यातून दोन वेळेस प्रथम क्रमांक, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गेल्या चार वर्षापासून अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, विविध सर्जनशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य, या सर्वांमुळे 2019 साली जिल्हा परिषदे कडून विशेष उल्लेखनीय शाळा पुरस्कार मिळाला तसेच शिक्षक वारुळे मागील वर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्याचप्रमाणे तालुकास्तरीय शिक्षक संघ कर्मचारी पतसंस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाख खंडाळा शाळा तालुक्यात गुणवत्तेत व सहशालेय उपक्रमात अग्रेसर असण्यात वारुळे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. या पुरस्काराचे वितरण वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे ,वैजापूर शहराचे मा. नगराध्यक्ष दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान , रामहरी बापू जाधव , साहेबराव औताडे , गटविकास अधिकारी एच आर बोयनार सर ,मनीषजी दिवेकर (शि.वि.आ.),बी.के. मस्के (शि.वि.आ.), व श्याम राजपूत चेअरमन साने गुरुजी जि. प. कर्मचारी सह. पतसंस्था मर्या. वैजापूर यांच्या हस्ते करण्यात आले.या पुरस्काराच्या निमित्ताने लाख खंडाळा गावातील ग्रामस्थ आदरणीय काळु पाटील वैद्य, सिताराम देवकर, परसराम देवकर, संतोष मोरे, बाबासाहेब मोरे, रावसाहेब मोरे, शिक्षक कानवडे टीम.पी ,गायके एस.डी,चित्ते जे.बी.,श्रीम.घोळवे , गुंड , फलके सर, शेख , धामणे , कोठावदे , लबडे , शहाणे,गवळी ,काकरवाल,गावीत आदी शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन केले