शिरूर (प्रतिनिधी) आज.दि.२६सप्टेंबर रोजी शिवसंग्राम शिरूर , धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा, श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पोषक फार्मर्स शेतकरी उत्पादक कं, तसेच रायमोह मससुल मंडळातील हिवरसिंगा, मलकाचीवाडी, औरंगपूर,ढोरकरवाडी,खलापूरी,व इतर सर्व गावातील शेतकरी यांचे अर्ज श्री.शिवराम राऊत चि‌.बाळासाहेब दुधाळ यांनी मा.विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेंकर सर यांची प्रत्यक्ष कार्यालय औरंगाबाद येथेभेटून रायमोह म.मं.सोयाबिन पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५%अग्रीम पीकविमा मिळवून देण्यासाठी निवेदन सादर केले.त्वरीत जिल्हाधिकारी बीड यांना योग्य त्या सुचना केल्या.

बीड जिल्हा पीकविमा समितीने सोयाबीन पीक २५%अग्रीम विमा मिळण्यापासून रायमोह महसुल मंडळाला वगळण्यात आल्याने मंडळातील सर्वच गावे रायमोह-दगडवाडी ,सांगळवाडी, डोळेवाडी, डिसलेवाडी, यवलवाडी ,वंजारवाडी, टाकळवाडी, खरगवाडी, धनगरवाडी, भानकवाडी१/२. ,हाटकरवाडी, अव्हळवाडी, बरगवडी,घुगे वाडी, खोकरमोहा, हिवरसिंगा, औरंगपूर ,मलकाचीवाडी ,ढोरकरवाडी,शिरापुर ,आनंदवाडी, खलापूरी, खांबा-लिंबा, पौडुंळ१/२/३ गावातील सर्व शेतकऱ्यांवर अन्याय आहे.या गावांमधील कृषि विभाग यांनी अंदाजे लागवड जरी १६१४ हे.केली आसली तरीही प्रत्यक्ष सोयाबीन लागवड अधिक प्रमाणात हे.जूलै-ऑगस्ट मधील सलग २० दिवसापेक्षा हि अधिक पावसाने ओढ दिल्याने ह्यातील सोयाबीन फूलगळ, करपणे,शेंगा कमी लागणे,किडरोग यामुळे उत्पादनात ६०%पेक्षा अधिक घट होणारी आहे त्यातच सप्टेंबर महिन्यात पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत सततच्या पावसामुळे खरिप हंगामी सोयाबीन, कपाशी, तुर,मुग उडीद,सह सर्व पीके नैसर्गिक आपत्तीच्या सामना करत आहेत.अशा स्थीतीत रायमोह मंडळातील शेतकरी प्रतिनिधी च्या वतीने मा.तहसिलदार साहेब शिरूर, मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांना अग्रीम पीकविमा मिळवून देण्यासाठी विंनती केली तरीही न्याय न मिळाल्याने मंडळातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे निवेदन, शिवसंग्राम संघटना , धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा , श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, यांनी सततचा पाठपुरावा केला आहे तरीही प्रशासनाने शिरूर तालुक्यातील इतर मंडळे समाविष्ट करण्यात आले आहे.व रायमोह मंडळ वगळले तालुक्यातील इतर मंडळात पावसाचा खंड व आमच्या मंडळात पाऊस असा अजब तर्क लवणे, अशा अनेक अन्याय कारक नोंदी अंदाजे अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना पीकविमा नाकरल्याने न्यायासाठी संघर्षाची वेळ आली त्यामुळे मंडळातील सर्व गावच्या ग्रामपंचायत ठराव, जनप्रतिनिधींच्या मागण्या मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद व यांना देण्यात आले आहे.या संघर्षातील खर्च करण्यासाठी मंडळातील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचा जमेल तशी रक्कम लोकसह भागातून जमा केली आहे..सततचा होणारा अन्याय दुर करण्यासाठी शेतकरीही सज्ज झाले आहेत. रायमोह मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९,२०२०,२०२१सलग तीन वर्षांत पीकविम्यासाठी हजारो रुपये खर्च करून व नैसर्गिक आपत्तीच्या सामना करूणही मदतीपासून वंचीत रहावे लागते.त्यासाठी प्रशासन अंदाजे आकडेवारी देणे, वीमाकंपनीच्या जाचक अटी यात मंडळातील शेतकरी भरडला जात आहे.त्या मूळे शेतकरी बांधवांनी आपल्या संतप्त भावना प्रगट करत नैराश्य यैत आहे यातच.सप्टेबंरच्या तब्बल २५दिवस होऊन गेले आहेत तरीही जमीनीत सततची ओल पडणारा पाऊस ,ढगाळ वातावरणामुळे किडरोग या मुळे खरिप हं.इतर पीके हि धोक्यात सापडलेली आहेत.अद्यापही प्रशासनाने गावनिहाय पंचनामे, विमा प्रतिनिधी यांनाही पाणी केली नाही..करिता.रायमोह मंडळातील शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पीक विमा २५%अग्रीम. रक्कम व सर्व पीक जोखीम नियमाप्रमाणे मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी माहिती शिवराम राऊत यांनी दिली आहे.