कदमवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उप सरपंच मा. दत्तात्रय दादा मजगे यांच्यावरती ग्रामपंचायतीच्या सरपंच व इतर पाच सदस्यांनी मिळून त्यांच्यावर ती अविश्वासाचा ठराव माननीय तहसीलदार माळशिरस यांच्याकडे सादर केलेला आहे.

कदमवाडी ग्रामपंचायत च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दलित समाजाचा उपसरपंच होण्याचा मान माननीय दत्तात्रय मजगे यांना मिळाला होता. त्यामुळे दलित समाजा मध्ये जातीय सलोखा ची भावना निर्माण झाली होती मात्र या अ विश्वासा च्या ठरावामुळे दलित समाजा मध्ये रोषाची भावना तयार झालेले आहे. अविश्वास ठरावा वरती सौ अरुणा संतोष कदम, सौ साधना आनंता इंगळे,श्री गणपत अण्णा भुजबळ, श्री ज्ञानदेव दामू कदम, सौ. विठाबाई सतीश कदम, सौ पारूबाई पांडुरंग कदम यांच्या सह्या आहेत