श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर सभासदांची बैठक बाणलिंग मंदिर फोंडशिरस येथे शेतकऱ्यांच्या थकीत एफ आर पी व कामगारांची देणी यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्या बाबद संपन्न झाली या वेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने मागील ऊस उत्पादक सभासद यांचे थकीत बिले आणि चालु एफ आर पी प्रमाणे बील दिले नाही कामगारांचे थकीत वेतन दिले नाही या संदर्भात पुढील भुमिका घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस जेष्ठ नेते भानुदास पाटील, कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास आप्पा सालगुडे,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील,राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, रावसाहेब पाटील, पै सुनील पाटील, शामराव पाटील,संभाजी बोकफोडे,भाऊसाहेब वाघमोडे, वैभव दडस यांच्या सह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. पुढील बैठक दि २९सप्टेबर गुरुवार रोजी दु ४वा मोरजाई मंदिर मोरोजी येथे आयोजित केली आहे कारखान्याचा संचालक मंडळाने आठ दिवसात योग्य निर्णय नाही घेतल्यास ऊग्र आंदोलन करण्याचे ठरविले आहे त्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मोरोजी येथे दि २९सप्टेबर रोजी बैठक आयोजित केली आहे सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.