घोणस आळी चावल्याने शेतकरी उपचारासाठी रुग्णालयात भरती 

"शेतकर्‍यांसमोर घोंगावतेय दुहेरी नैसर्गिक संकट"

पाचोड(विजय चिडे)शेतकर्‍यांसमोर सतत काही ना काही संकटे येत पहिले जनावरांवर लम्पी तर आता घोणस नावाच्या अळीच नवं संकट उभे राहिले. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना केकत जळगाव ता.पैठण एक प्रकार उघडीस आलेला असून येथील भुजंग भाऊसाहेब घुले (वय२२) हे रविवारी शेतात वखरणी करता असताना घोणसं आळीने चावल्यामुळे घुले या रूग्णास चक्क रुग्णालयात भरती करण्याची वेळ आलेली आहे.

दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकऱ्यांचे पिकांवर होत असून शेतकऱ्यांवर देखील त्याचा प्रादुर्भाव पडत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या कीड पडत आहेत. मात्र घोणस नावाची अळी जी गवतावर आणि उसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीच्या वातावरण पसरलेला आहे.

अगोदरच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी या दुहेरी नैसर्गिक संकटामुळे भीतीचे वातावरण निर्माण आहे.घोणस नावाची आणि विषारी असून अंगावर पडून चावल्याने असहाय्य वेदना झाल्याने आतापर्यत पाचोडच्या ग्रामीण रूग्णालयात दोन शेतकऱ्यांनावर उपचार करावे लागले आहेत. घोणस आळीचाही प्रादुर्भाव दिवसेंदिवस वातावरणात बदलांचा परिणाम शेतकर्‍यांच्या पिकांवर होत असताना ऊस आणि गवतावर घोणस नावाची हिरवट पिवळ्या रंगाची अळी आढळून येते. तिचा परिणाम केवळ पिकांवर न होता माणसांवरही होत असून, हा घातक परिणाम दिसून येत आहे. 

या अळीच्या त्वचेला स्पर्श झाल्यास त्वचेला खाज सुटून असह्य वेदना होते. नंतर उलट्या होऊ लागतात, अर्धे शरीर बधिर पडून जीभ अडखळून बोलताही येत नाही. चार दिवसापूर्वी अंबड तालुक्यातिल एका शेतकऱ्यांला या आळी चावल्याने उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रूग्णालयात आणले होत तर पुन्हा केकत जळगाव ता.पैठण उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाँ.संदीपान काळे,अधीपचारिक निशा खाडे यांनी या शेतकऱ्यांवर प्राथमिक उपचार केले आहे.

चौकट-या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच ही अळी अंगावर येऊ नये, याची खबरदरी घ्यावी, शेतात काम करताना अळीपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःला पुर्ण कपडे घालने गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर देखील येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी असे आवाहन पैठण तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी केले आहे.

चौकट-घोणस अळी ही हिरवट पिवळ्या रंगाची असून, ती रानटी गवतावरील अळी आहे. ती चावल्याने असह्य वेदना होतात. उलट्या होतात. त्यामुळे अळी अंगावर येऊ नये, म्हणून शेतकर्‍यांनी अंगभर कपड्यांचा वापर करावा. जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरोसायापरची फवारणी करावी. अळी कुठे आढळल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधावा.

   सुभाष धस, मंडळ कृषी अधिकारी.