जिंतुर तालुका रुग्ण हक्क संरक्षण समितीचे वतीने समिती प्रमुख श्री. निलेश करमोडी साहेब यांनी व जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप बनकर साहेब यांनी
दिलेल्या सूचनांनुसार आज दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०२:०० वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकित तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे रुग्णांना आरोग्य सेवा विषयी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा व रुग्णांची अपूर्ण सुविधा यासंबंधी चे नोंदी घेऊन शासनास पाठपुरावा करून रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा निर्धार करण्यात आला तसेच जिंतूर ग्रामीण रुग्णालय व ट्रामाकेअर सेंटर मध्ये दलालाच्या माध्यमातून होणाऱ्या रुग्णांच्या पिळवणूक थांबवणार असल्याचेही विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न करण्यात आली असून या बैठकीस परभणी जिल्हा संपर्क प्रमुख रहिम शेख हे विशेष उपस्थिती होते त्यांच्याकडून काही सूचना सुद्धा देण्यात आल्या त्याचे सुद्धा पालन होणार आहे, तसेच महिलांसंबंधी रुग्णालया त उद्भवणाऱ्या भौतिक सोयीसुविधीच्या अभावासंबंधी महिला ता, अध्यक्ष कविताताई घनसावत यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले तोही विषय बैठकीत घेण्यात आला यावेळी उपस्थित ता. सचिव संजय आडे, राजेंद्र घनसावत ,कैलास राउत ,