समर्पण पंधरवडा या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी तसेच पेण उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पेण मधील शिर्की गावामध्ये ग्रामपंचायत येथील भव्य सभा मंडपामध्ये संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.                           

            शिबिराच्या सुरुवातीस पंडित दीनदयाळ उपाध्याय व भारत मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन व शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना वैकुंठ पाटील यांनी, डॉक्टरांना 21 व्या शतकातील देव माणूस म्हणून संबोधले जाते. आपल्याला कोविड कोरोना काळात याची प्रचिती आली आहे. काळानंतर आपल्या शरीरामध्ये बरेच बदल झाले आहेत. शरीराची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. या आरोग्य तपासण्या शहरातील नागरिकांना लवकर उपलब्ध होतात. परंतु ग्रामीण भागातील जनता अपुऱ्या सोयी सुविधामुळे वंचित राहतात. हीच बाब गृहीत धरून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह व पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये मोफत औषधे ही देण्यात येणार आहे. जनतेने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा." असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिर्की सरपंच धनश्री गणेश पाटील, मसद सरपंच बळीराम भोईर, उपसरपंच प्रवीण पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शेखर पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष सदाशिव म्हात्रे ,उपसरपंच माई म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सविता गावंड, दत्ताराम पाटील, प्रियंका पाटील, आकाश म्हात्रे, राजाराम गावंड, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी रुग्णांची तपासणी डॉक्टर निकम मॅडम, डॉक्टर पल्लवी पाटील, डॉक्टर कामिनी मोकल, डॉक्टर राम शिंदे यांच्यासह 15 कर्मचारी स्टाफ यांच्या टीमने केली. 

           पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील शिर्की चाल नंबर एक, नंबर दोन, मसद, बोरवे, बोरी, शिर्की परिसरातील गावांमधील 500 ते 600 ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्यामुळे सदर गावातील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार रवीशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे आभार मानले.