सिल्लोड : माता ही कुटुंबाचे केंद्र बिंदू असते जिच्यावर कुटुंब अवलंबून असते व माता ही कुटुंबासाठी आपले सर्व आयुष्य झोकून देते व स्वतःला विसरून जाते व स्वतःचे स्वास्थय कडे दुर्लक्ष करते म्हणून राज्य शासन किशोरवयीन मुली व मातांचे स्वास्थ्य बळकट करण्याचे दृष्टीने सातत्याने पर्यास व प्रयत्न करत आहे या साखळीचे एक कडी म्हणून नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या नवरात्र उत्सव कालावधीत राज्य शासनाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राज्यभरात राबविण्याचे निश्चित केले आहे.राज्यभरात राबविले जाणारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा एक भाग म्हणून सिल्लोड तालुक्यात सुद्धा नवरात्र उत्सव कालावधीत ही मोहीम यशस्वीपणे राबविणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान पठाण यांनी एका प्रेस नोट द्वारे दिली आहे.माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड ग्रामीण रुग्णालय अजिंठा व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व 45 आरोग्य स्वास्थ्य उपकेंद्र अशा सर्व आरोग्य संस्थामार्फत विविध आरोग्य उपक्रम राबविले जाणार आहेत १८वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्ञीया यांचीआरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा देणार आहेत