खुलताबाद येथे ग्रामसेवक संघटना व ग्रामसेवक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एल.जी.गायकवाड राज्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना तथा माजी उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव गाणे पाटील,जिल्हा सरचिटणीस प्रेम बाबुराव नलावडे,औरंगाबाद पतसंस्थेचे चेअरमन रमेश आण्णा मुळे,सचिव सागर डोईफोडे,धनवई शिवाजीराव सोनवणे राज्य सल्लागार,खुलताबाद तालुकाध्यक्ष बनसोड बापु, पैठण तालुकाध्यक्ष खंडु वीर,कन्नड तालुकाध्यक्ष योगेश धाटबळे अदि ग्रामसेवक उपस्थित होते.