कन्नड तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या चिमणापूर विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत गजानन महाराज पॅनलचे १२ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले . तर नागेश्वर महाराज पॅनलचे प्रमुख प्रकाश गाडेकर यांच्या मुलाला आणि रोहिदास सपकाळ यांना सारखी मते मिळाली चिठ्ठी काढण्यात आली त्यामध्ये त्यांच्या मुलाची चिठ्ठी निघाली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाच्या मुलाला चिट्ठीने तारले असेच म्हणावे लागेल .गजानन महाराज पॅनलचे उमेदवार ८० ते ९ ० मताच्या मोठ्या फरकाने विजयी झाले . ग्रामपंचायती पाठोपाठ त्यांच्या गावातच त्यांचा हा दुसरा मोठा पराभव आहे . विजयी उमेदवार तेजराव ढोणे , रावसाहेब ढोणे , संजय ढोणे , अशोक सोळुंके , गणपत सोळुंके , योगेश सोळुंके , लक्ष्मण सोळुंके , पंडित नाडे , मोजगीर गिरी , कडूबा पंडित , मंजुळाबाई ढोणे , रूपमनबाई सोळुंके . यावेळी गजानन महाराज शेतकरी पॅनलचे विश्वास सपकाळ , वाल्मीक निर्मळ , अंबादास जाधव , राघो सोळुंके , संतोष सोळुंके , सुभाष ढोणे , अवचितराव सोळुंके , गंगाराम सपकाळ , विनायक ढोणे , तेजराव सोळुंके , देविदास सोळुंके , सुधाकर ढोणे , दत्तू ढोणे , दत्तू सोळंके , लक्ष्मण सोळंके , रामदास सोळुंके , गंगाधर ढोणे , गणेश सोळुके आकाश ढोणे इत्यादींनी परिश्रम घेतले

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं