अलिबाग तालुक्यात दिवसेंदिवस जनाधार वाढत आहे. नव्या उमेदीचे कार्यकर्ते येऊन मिळत असल्याने शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होत आहे. हे संघटन तालुक्यात आतापर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावण्यास सक्षम असल्याचा विश्वास अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या हस्ते तालुक्यात नव्याने नेमण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले, त्यावेळी बोलत होते.

आ. महेंद्र दळवी आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील शिवसेना (शिंदेगट) ची बांधणी नव्याने करण्यात येत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांवर विश्वास दाखवून संघटना वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे. आ. महेंद्र दळवी यांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचबरोबर या नियुक्तांमुळे तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना आ. महेंद्र दळवी म्हणाले की, कार्यकर्ते ही शिवसेनेची खरी ताकद आहे. या कार्यकर्त्यांमधूनच पदाधिकारी नेमण्यात आलेले आहेत. हे पदाधिकारी दिवसरात्र पक्षासाठी झटणारे आहेत त्यामुळे नवी संघटना अधिक भक्कम असून येथील प्रस्तापितांची अनेक वर्षाची सत्ता उलथवून लावण्यास सक्षम आहे, याची प्रचिती येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये येईल. 

आज नियुक्तीपत्र देण्यात आलेल्यामध्ये आलिबाग तालुका शिवसेना संघटक म्हणून कुसुंबळे येथील जीवन पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे, तर जिल्हा युवा सेना समन्वयक अजय गायकर, अलिबाग उपतालुका प्रमुख विकास निळकर, उपजिल्हा युवा सेना प्रमुख संकेत नाईक, युवा सेना तालुका संघटक अक्षय पाटील, युवा सेना तालुका प्रमुख संदेश थळे, युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील, युवा सेना उप तालुका प्रमुख नंदन पाटील, युवा सेना उपतालुका प्रमुख जीवन म्हात्रे, उपतालुका प्रमुख गणेश पाटील, काचली शाखाप्रमुख हिराचंद्र पाटील यांच्यासह *चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख मंगेश भगत, थळ जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख अजित म्हात्रे, मापगाव जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख जगदीश सावंत, शहापुर जिल्हा परिषद मतदार संघ संघटक डॉ. तुषार पाटील, शहापुर जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख सागर पाटील, कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, चौल जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख मंगेश ठाकूर, रामराज जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पृथ्वीराज पाटील* यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांना नियुक्ती पत्र आज देण्यात आले.