गेवराई, दि.24 (प्रतिनिधी) ः- माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याच्या भव्य मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ शनिवार, दि.24 रोजी संपन्न झाला. श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.योगीराज महाराज आणि चिंतेश्वर संस्थानचे ह.भ.प.मसन्नाथ महाराज यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात आला. रामकथा ज्ञानयज्ञ, किर्तन महोत्सव यांसह भजन संध्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने होणार आहे. पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.9 ऑक्टोबर रोजी मुख्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडप उभारणीच्या शुभारंभ प्रसंगी पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरातील र.भ.अट्टल महाविद्यालयात रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांची रामकथा, नामांकित किर्तनकारांचा समावेश असलेला भव्य किर्तन महोत्सव, सोंगी भारूड, पोवाडे, संगीत भजन आदी कार्यक्रमांचे दि.6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दि.9 ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री ना.संदिपानराव घुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, राज्यसभा सदस्या रजनीताई पाटील, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राजकीय नेत्यांसह बीड जिल्ह्यातील संत महंतांची