संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था म. हिंगोलीची
17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
हिंगोली : येथील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेची सन 2021-2022 ची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24. सप्टेंबर वार शनिवारी रोजी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. जनकराजजी खुराणा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेसाठी उपाध्यक्ष श्री. माणिकराव लोंढे, श्री. ॲड. नंदकिशोर मुंदडा, श्री. ललितराज खुराणा, श्री. जगजीतराज खुराणा, श्री.डॉ. किशन लखमावार, श्री. काशीनाथराव दराडे, श्री. नवीन परतवार, श्री. सुरेंद्र सावंत, श्री. बालाजी गलांडे, सौ. रितूताई खुराणा, सौ. रितिका खुराणा, सौ. विणाताई खुराणा, सभासद श्री. नंदकिशोर तोष्णीवाल, श्री. अशोकराव राऊत, श्री. पुरुषोत्तम बाहेती, श्री. उमाकांतराव बागले, श्री. मदनलाल बियाणी, श्री. ॲङ राहूल अग्रवाल, श्री. ॲङ रवि नायक, श्री. इंजि.विजय अग्रवाल, श्री. भगिरथजी अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनीलकुमार सिंह (सिन्हा) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासकीय व्यवस्थापक श्री. निलेश लाखकर यांनी केले तर कर्ज व वसुली विभागाचे व्यवस्थापक श्री. कल्याण देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सभासद, ग्राहक, पिग्मी एजंट, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.