चारठाना.
येथील मागिल आनेक दिवसापासून चालु असलेल्या मोबाईल मटका बुक्किवर काल दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास चारठाणा पोलिसांनी पहिलीच धाडसी मोठी कार्यवाही करत जवळपास 30 जणांवर गुन्हा नोंद केला असून अत्यंत छुप्या मार्गाने परंतु व्हाट्सअप व्दारे चालणारी जिल्हातील सर्वात मोठी मटका बुक्किवर छापा मारल्याने नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे.
बाबत अधिक माहिती अशी की, चारठाणा येथे परभणी जिल्ह्यातील मटका व्यवसायाचे सर्वात मोठे केंद्र चालु असल्याच्या आनेक बातम्या वृत्तपत्र व शोशल मिडियातुन प्रसिध्द होत होत्या परंतु आत्यत चाणाक्ष पध्दतीने अत्यंत छुप्या मार्गाने मोबाईल व्दारे गृप तयार करून पे फोन व्दारे देवान घेवान करत हा व्यवसाय चालवला जात होता त्या मुळे पोलिसांना धागे दोरे सापडत नव्हते परंतु परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका व्यवसाय चालु असल्याने चारठाणा गाव सर्वत्र चर्चेत होते या मोबाईल मटका व्यवसायावर चारठाणा पोलिसांनी आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस जमादार गुलाब भिसे,आस्मीता मोरे, शिवदास सुर्यवंशी,पो.ह.गावडे,पो.शि.पवन राउत, विष्णुदास गरुड यादी पथकाने सर्वात मोठी धाडसी कारवाई करत जवळपास 30 जणांना वर गु.र.नं व कलम 151/2022 कलम 12 अ म.जु.का. गुन्हा नोंद करण्यात आला आहे या बाबतची फिर्याद
स.त. गुलाब उत्तमराव भिसे यांनी दिली आसुन आरोपी 1) हनानमिया हमीदुल्ला शेख राहणार चारठाणा 2) संजय राठोड रा.जांब 3) बंडू चव्हाण राहणार सावरगाव. 4 )मोहन राठोड राहणार हलवीरा 5 )भिकाजी पारवे राहणार चारठाणा 6) नारायण राठोड राहणार सावरगाव 7 )धर्मा राठोड राहणार सायखेडा 8) शिवा राठोड राहणार सावरगाव 9 )रामा चव्हाण राहणार सावरगाव 10) लक्ष्मण राहणार सावरगाव 11 )साबळे राहणार सावरगाव 12) सोनुऴे रा. ब्राह्मणगाव 13) बालासाहेब केशव सौर रा. हनवत खेडा 14) सोपान 15) राजा रा. सावरगाव 16) भानुदास सुर्वे 17) भीमाशंकर आघाव राहणार बोरकिनी 18) सोनुळे राहणार सावरगाव 19) संदीप गीते 20 )पवार राहणार सायखेडा 21) भुजंग पांडुरंग राठोड राहणार सावरगाव 22) परसराम रानार सावरगाव 23) राजू राठोड राहणार चारठाणा 24 ) नामदेव जाधव राहणार सावरगाव 25 )बाळू गीते राहणार गीते पिंपरी 26) कयूम इनामदार राहणार चारठाणा 27) माणिक मामा राहणार सावरगाव 28 ) रामा बुधवंत राहणार वाई 29 )शंकर राठोड राहणार चारठाणा 30) राजेश काळे राहणार वाटुर ता परतूर जि जालना या प्रमाणे ये असुन
दि.21/09/22 रोजीचे 16.25 वा. सु. मोजे चारठाणा येथे आरोपी क्रमांक एक याचे राहत्या घरासमोर दर्गा रोड परिसरात हन्नान शेख हा त्याचे राहत्या घरासमोर बेकायदेशीररित्या लोकांकडून रोख उदारीवर तसेच फोन पे वर पैसे घेऊन त्याचे मोबाईलवर कल्याण व मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे घेऊन कल्याण व मिलन नावाचा मटका जुगार चालविताना मिळून आला व ईतर आरोपींनी स्वतःच्या फायद्या करिता मटका आकड्यावर पैसे लावून जुगार खेळला तसेच आरोपी हनानमिया यांनी सदरच्या लोकांकडून मटक्याचे आकड्यावर पैसे घेऊन मोबाईल मटका बुक्की मालक आरोपी शंकर राठोड राहणार चारठाणा व मोबाईल मटका बुक्की मालक राजेश काळे यांना व्हाट्सअप अकाउंट वरून जुगाराच्या पट्ट्या त्याचे व्हाट्सअप वर पाठविल्याचे सांगितले या कार्यवाहीत एक निळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 5000 ,एक लाल रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 5000 व नगदी राेख रकम 11070 असे एकुण 21,070 हस्तगत करण्यात आले घटना स्थळी सपाेनि बालाजी गायकवाड, विनोद साने यांनी भेट दिली आसुन पुढील तपास चालू आहे