शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

हिंगोली प्रतिनिधी/गोपाल सातपुते

हिंगोली : येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. निवृत्ती हुरगुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. रामदास मुक्टे तसेच कनिष्ठ विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. देवानंद येवले उपस्थित होते. सध्याच्या काळात समाज हिताच्या दृष्टीने आणि विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजना ही किती महत्त्वाची आहे हे डॉ.मुक्टे यांनी सांगितले. प्रा. देवानंद येवले यांनी सुसंस्कारित नागरिक घडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. हुरगुळे एन.आर. म्हणाले सध्याच्या काळात नैतिक मूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे आणि हे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप विशद करणारी ‘राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय?’ ही नाटिका राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सादर केली. यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे नेमके स्वरूप, उद्दिष्ट, महत्त्व सांगण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता मुंढे सह समन्वय डॉ. मनीषा गवळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हर्षदीप पाईकराव, चरण कांबळे, आकाश खंदारे, पवन धुळे, वैष्णवी मुसळे, शामबाला भाकरे इ. विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनीषा गवळी यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी बळीराम शिंदे यांनी मानले.