सोलापूर - माळशिरस तालुक्यांतून सायकल बॅंकेस भरभरून प्रतिसाद मिळत आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अकलूज शंकर नगर येथे अंगणवाडी केंद्र प्रियंका नगर येथे पोषण माह अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी सीईओ श्री स्वामी यांचे हस्ते सायकल वाटप करणेत आले. अकलूज येथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाचे वतीने १९ सायकली तर माळशिरस प्रकल्पाचे वतीने १६ सायकली अशा एकुण ३५ तर पंचायत समिती सर्व अधिकारी कर्मचारी लोकसहभागातून एकूण 100 सायकलींचे वाटप करणेत आले. याप्रसंगी गट विकास अधिकारी विनायक गुळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष श्रद्धा जवंजाळ, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती रब्बना शेख, श्रीमती श्यामला कुलकर्णी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
बाल विकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी विविध कार्यक्रमाच् आयोजन केले होते. पोषण अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी सिईओ दिलीप स्वामी यांनी केली.
माळशिरस सायकल बॅंकेचे उगमस्थान असल्याचे सांगून श्री स्वामी म्हणाले, माळशिरस तालुक्यांतील निमगाव येथून सुरू झालेली सायकल बॅंकेची चळवळ संपुर्ण जिल्ह्यात जात आहे. सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद येत असताना यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पात काम करणारे सुपरवायझर , अंगणवाडी सेविका , मदतनीस यांनी देखील सायकल बॅंकेस मदत केली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना तुटपुंजे मानधन असताना त्यांनी सायकल बॅंकेस केलेले दान प्रेरणादायी आहे. माळशिरस तालुक्यांतील गायकवाड या मुख्याध्यापका्ने दीड लाख रूपये सायकल बॅंकेस दिले. निमगाव येथील ग्रामस्थांनी सुरू केलेली चळवळ वेग घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.