सोलापूर : हैदराबाद रोड परिसरातील गंगाई केकडे नगर या ठिकाणच्या महिला लहान मुलं आणि वृद्ध यांनी महापालिकेवर मोठा घागर व कळशी मोर्चा काढला होता. दिवाळीपर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला होता.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गंगाई केकडे नगर विकास समितीचे अध्यक्ष रियाज मोमीन, जनरल सेक्रेटरी भीमाशंकर लोहार, सेक्रेटरी अंदाणी सुतार, सदस्य नम्रता हरे, सदस्य जयश्री बनसोडे, सिद्धराम कांबळे, धनाजी सातपुते, सचिन सोनवणे, अनुसया पात्रे, आनंद गायकवाड, गणेश गायकवाड, सुनील नागेशी, मनीषा माने, रेणुका बेळळे, उषा कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होता. 

शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली असता लवकरच तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन पी शिवशंकर यांनी दिले होते दरम्यान आठ दिवसातच या आंदोलनाला यश आले. महानगरपालिकेने अखेर टँकरने केकडे नगरला पाणीपुरवठा सुरू केला आहे, टँकर दाखल झाला असता विकास समितीचे अध्यक्ष रियाज मोमीन यांच्या हस्ते पूजा करून पाणी घेण्यात आले. यावेळी महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता.