कन्नड़ तालुक्यातिल देवगाव रंगारी येथिल संत सावता मंगल कार्यालय येथे आमदारांची राहुटी या कार्यक्रमांतर्गत .आमदार उदयसिंग राजपूत यांना जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने मा. अतुल खूपसे पाटील जनशक्ती शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने मा. प्रदेशाध्यक्ष उमाकांत जी तिडके पाटील तसेच जिल्हाप्रमुख अनिल पाटील शेळके यांच्या सूचनेप्रमाणे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी सर्कल मधील रस्त्याची सर्वात मोठी समस्या पूर्ण करावी यासाठी कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंह राजपूत यांना जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये कन्नड तालुकाध्यक्ष संदीप भाऊ गोरे ,गोकुळ हिवाळे शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष ,संतोष सोनवणे युवा आघाडी तालुकाध्यक्ष, चेतन सोनवणे शाखाप्रमुख देवगाव रंगारी ,सुनील शिरसे शाखाप्रमुख देवगाव ,संजय चोथरे सर्कल प्रमुख देवगाव, दत्तू रावते शहर प्रमुख देवगाव ,अमोल सोनवणे उपशहर देवगाव ,इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .तसेच देवगाव, देवळी, ताडपिंपळगाव येथील शेतकरी यामध्ये श्री रामेश्वर बाबुराव ठोंबरे, भाऊसाहेब मुळे ,आबाराव निकम ,येडूबा मुळे, पोपट सोनवणे, हरी मुळे, दत्तू मुळे ,सचिन मुळे, भारत ठोंबरे, बाळू मुळे ,शांतीलाल पठारे ,शरद ठोंबरे ,राजू मुळे ,जगन्नाथ शिंदे, सोमनाथ मुळे ,नीलवर्ण देसाई, तुकाराम रावते शरद गायकवाड, रघुनाथ मुळे इत्यादी .शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
1) देवगाव रंगारी सर्कलमधील रस्ते दुरावस्था झालेली आहे. देवगाव ते बोरगाव या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे त्यामध्ये देवगाव ते ताडपिंपळगाव रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरुस्त झालेले आहे दुरावस्था झालेली आहे शाळकरी मुले मुली शेतकरी व्यापारी वर्गाची सर्व मोठी समस्या आहे
2)देवगाव देवळी रस्त्याची दुरावस्था गेल्या दहा वर्षापासून दुरावस्था आहे तरी त्वरित पूर्ण करावी
3)देवगाव झोलेगाव रस्ता स्वातंत्र्य काळापासून झालेला नाही शाळकरी मुला-मुलींना त्रास होतो यासाठी त्वरित पूर्ण करावा
4) देवगाव रंगारी ग्रामपंचायत हद्दीत कॉलनी अंतर्गत रस्ते गेल्या 25 वर्षा पासून अपूर्ण अवस्थेत आहे स्टेट लाईट नाही पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे ती पूर्ण करावी
5)जनावरांना नवीन रोग लागण झाली आहे चे नाव लंपी आहे. हा आजार जोर धरतो आहे यासाठी स्वतंत्र सोडियम क्लोराइड फवारणी करावी व लस उपलब्ध करावी
6)जनावरांसाठ क्वारंटाईन सेंटर उपलब्ध करून द्यावी यासाठी शासनाने तरतूद करावी या सर्व रस्त्याच्या कामास त्वरित मंजुरी न मिळाल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले