बीड प्रतिनिधी :- जय मातादी नवरात्र उत्साव समिती, अंबिका चौक, पांगरी रोड, शाहुनगर, बीड ची सन 2022 ची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. सदर उत्सव समितीची बैठक दि.15.09.2022 रोजी श्री.रामभाऊ खोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, उत्सव समितीचे आयोजक श्री.राजुभाऊ महुवाले हे आहेत, सदर बैठकीमध्ये सर्वांनुमते अध्यक्ष सौ.चंदा राजु महुवाले, उपाध्यक्ष - सौ.मनिषा अशोक हरणमारे, सचिव - सौ.सविता नितीन नाईकवाडे, कोषाध्यक्ष - सौ.उषा संतोष दराडे, सदस्य - सौ.शिल्पा सचिन चंदनशिव, सौ.काशिबाई वामनराव बांगर, सौ.अश्विनी प्रदिप वाघ, सौ.कालुदेवी दिलीपकुमार बोरना यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यकारणीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते चर्चा होवून असा ठराव जाहिर करण्यात आला की, या वर्षी नवरात्र उत्सवामध्ये समिती मार्फत विविध सामाजिक उपक्रम / कार्यक्रम, महिलांसाठी सामुहिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, गरजु लोकांसाठी शासकिय योजनांचा लाभा घेण्यासाठी मार्गदर्शन व उपक्रम, महाप्रसाद. तसेच उत्सव समिती मार्फत नवरात्र उत्सवामध्ये संपुर्ण नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
सदर बैठकीवेळी उत्सव समितीचे सदस्य व शाहुनगर भागातील प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी, व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.