शिक्रापुरातील कचरा आंदोलनाबाबत ग्रामपंचायतची बैठक

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला असल्याचे समोर येत असताना आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कचरा आंदोलनाबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली आहे.

                                शिक्रापूर ता. शिरुर येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केले असल्यामुळे ग्रामपंचायतच्या कचरा गाड्या देखील बंद झाल्याने नागरिकांच्या घरातील कचरा घरातच साठवला गेला मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे, तर नुकतीच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सारिका सासवडे, सोमनाथ भुजबळ, गणेश लांडे यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीत काही ठिकाणी भाडे तत्वावर कचरा प्रकल्पासाठी जागा घेऊन प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा झाली परंतु अनेक ठिकाणहून नागरिकांनी आमच्या भागात कचरा प्रकल्प नको म्हणून ग्रामपंचायतकडे तक्रारी अर्ज दाखल केले त्यामुळे अडचण निर्माण झाली असताना अखेर एका ठिकाणी भाडेतत्वावर शेड घेण्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले मात्र आता पुढे काय होणार याकडे सर्व नागरिकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सध्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून एका ठिकाणी रेडी असलेले शेड भाडेतत्वावर घेण्याचे ठरले असून त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार असून सध्याचा गोळा होणारा कचरा एका अन्य ठिकाणी संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.