औरंगाबाद:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत निकषांमध्ये बसत नसल्याने बँकेने कर्ज नामंजूर केले . त्याचा राग आल्याने प्रदीप बबन साळवे ( ३० , रा . रमानगर ) याने 21 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडको एन -१ येथील झोनल कार्यालयात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला . बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडको एन -१ येथील झोनल कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत केसगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , साळवे हा दुपारी दीड वाजता सुरक्षा रक्षकांशी जोरजोरात वाद घालत होता . तेव्हाच त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेतला . अधिकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने कारण सांगितले . तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज का देत नाही , असा प्रश्न केला . त्यावर अधिकाऱ्यांनी सिबिल रेकॉर्ड खराब असणे , मागणीप्रमाणे खरेदी करणाऱ्या मशीनचा जीएसटी क्रमांक नसणे , अपेक्षित आयकर रिटर्न भरलेला नसल्यामुळे फाइल नियमात बसत नसल्याचे सांगितले . तरीही त्याने स्वत : ला पेटवून घेतो , असे म्हणत शिवीगाळ केली . याप्रकरणी प्रदीप साळवे याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
फॅशन शोमध्ये तुलशी महाविद्यालयाचे यश
कलाश्री आयोजित गरबा दांडिया महोत्सव व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन कैलास शिंदे,अपेक्षा शिंदे यांनी...
નાર ગામેથી લાખોના કોપરની ચોરી
પેટલાદ તાલુકાના નાર ગામે આવેલ સબ સ્ટેશનમાંથી લાખો રૂપિયાની કિંમતના કોપરની ચોરી થતા આ અંગે પેટલાદ...