गेवराई ( प्रतिनिधी ) नाथसागरातून गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेस पाण्यामुळे माजलगाव तालुक्यातील तालखेड सर्कल मधील गव्हाण थडी गावाला पाण्याने वेडा दिला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे. याची माहिती मिळताच शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी ट्रॅक्टर मध्ये बसून आपल्या सहकाऱ्यांसह गव्हाण थडीत जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. आपण सुरक्षित स्थळी बाहेर निघा, आपला प्रश्न शासन स्तरावर आपण मार्गी लावू अशी ग्वाही दिली.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पैठण येथील नाथसागरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे नाथसागराचे अठरा दरवाजे उघडले असून यातून हजारो क्युसेस पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे गेवराई तालुक्यासह माजलगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच तालखेड सर्कल मधील गव्हाण थडी या गावाला पाण्याचा वेढा बसल्याने, येथील ग्रामस्थांचा चार दिवसापासून संपर्क तुटला आहे. मात्र त्यांची कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्याने गावात जाऊन भेट घेतली नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. मात्र याची शिवसेना सोशल मीडिया प्रमुख अशोक नाईकनवरे यांच्याकडून माहिती मिळताच शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिनांक 20 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर मध्ये बसून आपल्या सहकाऱ्यांसह थेट गव्हाण थडी गाठली आणि तेथील ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. रस्त्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शासन स्तरावर आपण स्वतः पाठपुरावा करून तो मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी बदामराव पंडित यांनी ग्रामस्थांना दिली. त्यासोबतच आपण सुरक्षित तरी स्थलांतर करावे अशी विनंती केली. याला गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य भास्करराव कचरे, सरपंच नवनाथ नेहरकर, उपसरपंच नितीन पाटेकर, प्रकाश पाटेकर, दत्तात्रय पाटेकर, सोपान पाटेकर, सुग्रीव बदाले, प्रकाश मेहरकर, रमेश घुंगासे, प्रमोद नेरकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.