कन्नड : तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी , अशी मागणी माजी आमदार नामदेव यांनी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्याकडे निवेदनावर बुधवारी केली . कन्नड तालुक्यातील पवार आठही महसूल मंडळांत गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे . त्यामुळे मका , कपाशी , तूर , मोसंबी , सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे . कन्नड़ तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून ६३.३ मिमी पावसाची नोंद आहे . यामध्ये चापानेर मंडळात तर सर्वाधिक म्हणजे ९ ३.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे . करंजखेडा , नाचनवेल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना अजूनही शासनाकडून पंचनामे सुरू नाही . त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर माजी आमदार नामदेव पवार , याकूब शेख , शिवाजी थोरात , गणेश शिंदे , पठाण महेमुदखा , विजय चव्हाण , शेख आसद , बाबासाहेब वरपे , जगन्नाथ पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .