मुंबई - गोवा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असुन या खंड्यामुले सर्व सामान्य जनतेला प्रवास करणे अवघड होत आहे तर अनेक अपघात होवुन अनेकाचे प्राण गेले आहेत. वडखळ ते माणगाव पर्यत महामार्गाची दुरावस्था झाली असुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माणगाव तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास सुर्वे यांचे नेतृत्वाखाली वडखळ नाका येथे काॅग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आली.
गेली अनेक वर्ष मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडले असुन वडखळ नाका ते माणगाव पर्यत महामार्गाची दुरावस्था झाली असुन माणगाव वरुन आजारी रुग्णाना अलिबाग कींवा मुंबईला नेताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आसल्याने या महामार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अन्यथा कोकणात जाणारा हा मार्ग आडवुन तिव्र आंदोलन करण्यात येईल असे माणगाव तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी या वेळी सांगितले.
वडखळ नाक्याची ओळख बटाटा वडा व चहा अशी होती या ठिकाणी आत्ता खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. तर मुंबई गोवा महामार्गाची ओळख खंड्डयाचे साम्राज्य अशी झाली असुन शासनाने लवकरात लवकर या महामर्गाची दुरुस्ती करावी अन्यथा तिव्र आंदोलनाचा ईशारा काॅग्रेसचे जिल्हा चिटणिस परशुराम म्हात्रे यांनी दिला.
या वेळी काग्रेसचे जिल्हा चिटणिस परशुराम म्हात्रे ,नरेंद्र सिंह , पेण तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष अशोक मोकल, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, माजी पंचायत समीती सदस्य प्रदिप म्हात्रेआदि सह पेण,माणगाव तालुक्यातील काॅग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
————