बुलढाणा दिनांक 23 सप्टेंबर

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रामुख्याखाली व उद्घाटना संबंधी दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 च्या मातंग समाज संवाद मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. माननीय धैर्यवर्धनजी पुंडकर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी तथा ज्येष्ठ नेते ,वंचित शरदभाऊ

वसतकार, गणेश जी चौकशे  जिल्हाध्यक्ष ,निलेश भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष दक्षिण, व सर्व पदाधिकारी वंचित भीमराव तायडे माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा नारायणरावजी जाधव मातंग समाज ज्येष्ठ नेते, कैलासजी खंडारे लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य, संजय बोदळे मातंग समाज समन्वय समिती, विजय सोनोने महासचिव समन्वय समिती, मुकेश गवई जिल्हा कार्याध्यक्ष समन्वय समिती, व सर्व पदाधिकारी समिती यांच्या मार्गदर्शनामध्ये बैठक होणार आहे. या होणाऱ्या मातंग संवाद महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी सदर बैठकीचे दिनांक 25 सप्टेंबर 2022 रविवार रोजी तीन वाजता विश्राम गृह बुलढाणा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.