पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कै. राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या संगणक संचाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त माननीय दिनेश यन्नम परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला मुख्याध्यापक व्यंकटेश पोटाबत्ती सर, नामदेव म्यांना व शाळेतील शिक्षक, पालक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांकरता संगणक कक्षाची सोय करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
तसेच श्री तिरुपती परकीपंडला यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रिया कुलकर्णी यांनी तर आभार स्मिता चिंताकिंदी केली यांनी केले.