सोलापूर मॅरेथॉनमध्ये नागरीकांनी मोठ्यासंख्येने नाव नोंदवून सहभाग घ्यावे - आयुक्त पी शिवशंकर

सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सोलापूर मॅरेथॉनमध्ये सोलापूर नागरीकांनी मोठयासंख्येने नाव नोंदवून सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी केले. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पालिका आयुक्त शिवशंकर यांनी स्वत: नाव नोंदवून नोंदणीचा शुभारंभ केला. 

शरीरासाठी व्यायामाची गरज असते आणि चालणे आणि पळणे यातून शरीराला चांगला व्यायाम होतो या हेतुने सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून सोलापूर मध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी कोरोनाच्या मुक्ती नंतर होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुभारंभ करण्यात आला आहे नागरीकांनी मोठ्यासंख्येने या मध्ये नाव नोंदवून सहभाग घ्यावा असेही मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.

रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रारंभी डॉ. विनायक देशपांडे यांनी सोलापूर मॅरेथॉन आणि सोलापूर रनर्स असोसिएशनबाबतची माहिती दिली. नंतर सचिव डॉ.विश्वास बिराजदार यांनी नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर स्वत: नोंदणी करून घेत मॅरेथॉनच्या नोंदणीचा शुभारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शानदार आयोजन करण्यात येणार असून कोरोनाच्या महामारीनंतर आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर मॅरेथॉन बाबत मोठा उत्साह असणार आहे. या मॅरेथॉनची तयारी चांगल्या पध्दतीने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर रविवारी मॅरेथॉनची तयारी म्हणून पळण्याचा सराव होणार आहे. तसेच विविध उपक्रमाचे आयोजन मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले. सोलापूर शहर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील शहरातील नागरीक, तरूण, धावपटू यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी   www.solapurmarathon.com    या बेबसाईटवरून आपल्या नावाची नोंदणी करावी असे सोलापूर रनर्सचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया यांनी आवाहन केले.यावेळी रनर्स असोसिएशनचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार, रेस डिरे्नटर डॉ. विक्रम दबडे, खजिनदार डॉ. योगेश जडे, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. नितीन बलदवा,डॉ. किरण किणीकर, डॉ. यशवंत पेठकर, डॉ. प्रदीप भोई, ओंकार दाते, श्रीनिवास संगा आदी उपस्थित होते.