सवड नजीक हळद घेऊन जाणारे पिकप पलटी, सुदैवाने जीवित हानी टळली.

हिंगोली तालुक्यातील सवड नजीक आज सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास वैजापूर येथून हळद घेऊन जाणारे पिकप पलटी झाल्याची घटना 22 सप्टेंबर गुरुवार रोजी सायकांळच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही हे पिकप वैजापूर येथून येत असताना सवड नजीक अचानक झोल मारल्याने पिकप पलटी झाले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून पलटी झालेल्या पिकप मधील हळद दुसऱ्या वाहनात टाकून हळद मार्केटमध्ये रात्रीच नेण्यात आली.