बीड-परळी रेल्वे मार्गाचे नगर-आष्टी पर्यंत काम पूर्ण झाले असून,येत्या शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंञी ना.रावसाहेब दानवे,राज्याचे मुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांचा रेल्वे उद्याटनासाठी अधिकृत दौरा आला असून,आज सोलापूर मध्य रेल प्रबंधक शैलेश गुप्ता व रेल्वेच्या सर्व विभाग प्रमुखांनी आष्टी रेल्वेस्टेशनची पाहणी केली असून,नगर-आष्टी रेल्वेची रेल्वे प्रशनाकडून जयत्त तयारी सुरू असल्याने आष्टीकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे

           आष्टी-अहमदनगर रेल्वेचा शुभारंभ दि.23 सप्टेंबर पासून सुरू होत असून,या रेल्वे मार्गाची पाहणी आज दि.20 रोजी दुपारी चार वाजता सोलापूर रेल्वे विभागाचे मंडल प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी पाहणी करत आवश्यक त्या सुचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.नारायणडोह-सोलापूरवाडी-लोणी-धानोरा-कडा व आष्टी रेल्वे स्थानकाची पाहणी करत आष्टी येथे दि.23 रोजी सकाळी 11 वा.केंद्रीय रेल्वे राज्यमंञी ना.रावसाहेब दानवे,राज्याचे मुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस,माजी मंञी पंकजा मुंडे,खासदार प्रितम मुंडे,खा.रजनी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टी-नगर रेल्वेचा शुभारंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सोलापूर मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता रेल्वेचे सर्व विभागाचे अधिकारी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पाहणी करत यांनी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या आहेत.