मराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चाकरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाले आहे. दिवसाढवळ्या या रस्त्यांवरुन प्रवास करतांना येणार्‍या जाणार्‍या भाविक भक्तांना तसेच नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतोय. आमदार, खासदार आणि अधिकारी ये-जा करतात. परंतु त्यांना या रस्त्यांची दुर्दशा दिसत नाहीत काय? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असतो. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचल्याने या खड्ड्यांचा वाहन धारकाना अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या खड्ड्यात आदळल्या जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वा काय रस्ता, काय खड्डे अन् खड्यात पाणी, निवडणूक जवळ आली की नुसतं आश्वासन देऊन मोकळे होतात राजकीय लोक असाच सध्या नागरिकांमधून सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्यामध्ये पडलेल्या खड्डयांचा स्थानिक रहिवाशांना तसेच श्री क्षेत्र चाकरवाडी कडे येणाऱ्या भावी भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात झालेल्या पावसाने जवळपास सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तरी लवकरात लवकर चाकरवाडी कडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तसेच रिक्षा चालकांनी यावेळी केली आहे.