कन्नड : शेती कर्ज देऊन टाकू , मी शेतातून चक्कर मारून येतो , असे पत्नीला सांगून भावलाल शेतात गेले होते . लोकांचे , बँकेचे पैसे द्यायचे कसे या विवंचनेत त्यांनी आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली , असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले . कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रूपेश माटे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला . कन्नड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली . पुढील तपास बीट जमादार संदीप कनकुटे करताहेत . कर्जबाजारीपणा व अति पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याच्या चिंतेने तालुक्यातील सीतानाईक तांडा येथील ऊसतोड मजूर भावलाल नरसिंग राठोड ( ५० ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . ही घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली .