शिरुर दि .२२ येथील आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साईराम भारत गॅस एजन्सीचे वितरक रामनाथ कांबळे यांचा नुकताच मृत्यू झाला . त्यासाठी डिजेचा कर्णकर्कश आवाज जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे . त्यामुळे यापुढे शिरुर शहरात डिजे वाजवायचा नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे . तसेच कुणी डिजे बाजवल्यास तोडफोड केली जाणार असल्याचेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे . शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षन्या असलेले सदरील निवेदन है जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे . दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शहरात वर्षभर विविध प्रकारच्या धार्मिक सामाजिक , सांस्कृतिक तसेच कौटुंबिक कार्यक्रम होतात . त्यानिमित्ताने मिरवणूक काढण्यात येते . त्या मिरवणुकीसाठी संबंधित डिजेचा वापर करतात . सदरील डिजेचा कर्णकर्कश आवाजाचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो . यावर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर डिजे वाजवण्यात आले . यावेळी आवाजाच्या सर्व मर्यादा मोडण्यात आल्या होत्या , प्रशासनाने देखील त्यावर कसल्याही प्रकारचा प्रतिबंध केला नाही . त्याचा परिणाम शिरूर तालुका आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्या प्रकृतीवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . डिजेच्या मोठ्या आवाजामुळे कुठल्याही कार्यक्रमासाठी डिजेची परवानगी देवू नका शिरुर शहरातील कोणत्याही कार्यक्रमाला डिजेची परवानगी देऊ नये , डिजे वाजल्यास त्याची तोडफोड करण्यात येईल . होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल , असे निवेदन देण्यात आले . त्यवर माऊली पानसंबळ , नगरसेवक दादा हरिदास , अरुण भालेराव , निलेश ललवाणी , प्रताप कातखडे , बंदरे , सतिश मुरकुटे , राजेंद्र घोरपडे , अशोक अंदुरे , आजीनाथ गवळी , कल्याण तांबे , संतोष कांबळे , विठ्ठल बनवे , प्रकाश साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .