शिरुर दि .२२ येथील आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साईराम भारत गॅस एजन्सीचे वितरक रामनाथ कांबळे यांचा नुकताच मृत्यू झाला . त्यासाठी डिजेचा कर्णकर्कश आवाज जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे . त्यामुळे यापुढे शिरुर शहरात डिजे वाजवायचा नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे . तसेच कुणी डिजे बाजवल्यास तोडफोड केली जाणार असल्याचेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे . शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षन्या असलेले सदरील निवेदन है जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे . दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शहरात वर्षभर विविध प्रकारच्या धार्मिक सामाजिक , सांस्कृतिक तसेच कौटुंबिक कार्यक्रम होतात . त्यानिमित्ताने मिरवणूक काढण्यात येते . त्या मिरवणुकीसाठी संबंधित डिजेचा वापर करतात . सदरील डिजेचा कर्णकर्कश आवाजाचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो . यावर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर डिजे वाजवण्यात आले . यावेळी आवाजाच्या सर्व मर्यादा मोडण्यात आल्या होत्या , प्रशासनाने देखील त्यावर कसल्याही प्रकारचा प्रतिबंध केला नाही . त्याचा परिणाम शिरूर तालुका आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्या प्रकृतीवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . डिजेच्या मोठ्या आवाजामुळे कुठल्याही कार्यक्रमासाठी डिजेची परवानगी देवू नका शिरुर शहरातील कोणत्याही कार्यक्रमाला डिजेची परवानगी देऊ नये , डिजे वाजल्यास त्याची तोडफोड करण्यात येईल . होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल , असे निवेदन देण्यात आले . त्यवर माऊली पानसंबळ , नगरसेवक दादा हरिदास , अरुण भालेराव , निलेश ललवाणी , प्रताप कातखडे , बंदरे , सतिश मुरकुटे , राजेंद्र घोरपडे , अशोक अंदुरे , आजीनाथ गवळी , कल्याण तांबे , संतोष कांबळे , विठ्ठल बनवे , प्रकाश साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
हनुमानगढ़ की घटना पर क्यों आग बबूला हुईं मायावती? बेनीवाल- डोटासरा भी सरकार पर बरसे
राजस्थान के हनुमानगढ़ के संगरिया थाना क्षेत्र के एक गांव से बहलाकर दो नाबालिग बहनों को ले जाने...
विरोधी पक्षनेता नामदार अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नंद कुमार घोडीले,नरेंद्र त्रिवेदी, किशनचंद तनवाणी,विजय वाघचौरे,राजु वैद्य,प्रतिभा जगताप,बाळासाहेब थोरात,विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, हनुमान शिंदे,संतोष जेजुरकर यांच्या निवा
विरोधी पक्षनेता नामदार अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची सदिच्छा भेट...
KCR govt playing in hands of land mafia, exploiting youth: Chugh
BJP national general secretary Tarun Chugh, who is also party incharge of Telangana, today gave a...
#Agra फर्जी क्राइम ब्रांच अधिकारी को दबोचा:परीक्षार्थी से ठगे थे 75 हजार रुपये
#Agra फर्जी क्राइम ब्रांच अधिकारी को दबोचा:परीक्षार्थी से ठगे थे 75 हजार रुपये