चुलत चुलत्यांनेच केला पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
"पैठण तालुक्यातिल कडेठाण तांडा येथील माणुष्कीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना"
पाचोड(विजय चिडे) किराणा दुकानात गोळ्या बिस्कीट आण्यासाठी आलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर सख्ख्याचुलत चुलत्यांनेच बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना कडेठाण तांडा ता.पैठण येथे बुधवारी (दि.२१) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस घडली असून बळीराम सिताराम चव्हाण (वय२५) रा.कडेठाण तांडा यांच्या विरूद्ध पाचोड ता.पैठण पोलिस ठाण्यांत गुरुवारी (दि.२२)रोजी बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातिल कडेठाण तांडा येथे बळीराम सिताराम चव्हाण याची किराणा असल्यामुळे पीडित मुलीचे घर शेजारीच आहे.ती बुधवारी सायंकाळीच्या वेळी दुकानात गोळ्या बिस्कीट आण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला दुकानाच्या घेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.त्यानंतर ती चिमुकली घरी रडत रडत गेली. मात्र,मुलगी का रडत आहे असे आईने विचारलं त्यावेळी ती घाबरली असल्यामुळे तीला काही सांगता येत नव्हते.
त्यावेळी चिमुकलीच्या आईने तिला विश्वासत घेऊन विचार पुस केली असता तिने घडलेला प्रकार आई सांगितले. त्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी गुरुवारी (दि.२२) लगेच पाचोड पोलिस ठाणे गाठून सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची माहीती दिली असता पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक उपनिरिक्षक सुरेश माळी,बीट जमादार संतोष चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक जनाबाई सांगळे यांच्या पथकास घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे याकरीत आहे.