मुंबई: राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी गुरुवारी देशातील 10 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) नेत्यांच्या घरांवर दहशतवादविरोधी सर्वात मोठ्या कारवाईचा भाग म्हणून छापे टाकले.आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने राज्य पोलिसांसह 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांना अटक केली असुन PFI शी संबंधित औरंगाबाद मधील 4 लोकांना अटक केली आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शहरांमध्ये छापे टाकले जात आहेत. औरंगाबादच्या विविध भागातून PFI या संघटनेची संबंधित असलेल्या चार जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले असून मुंबई पुणे ठाणे नाशिक या भागामधील एटीएसटी कारवाई सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पुणे व मुंबई येथील एटीएसचे पथक औरंगाबाद दाखल झाले होते. औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये टोमॅटो डिलिव्हरी बॉय असलेला व पूर्वी PFI शी संबंधित असलेला सय्यद फैसल याला हडको भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर इमरान मील्ली याला किराडपुरा तर इतर दोघांना अन्य भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या चौघांची चौकशी सुरू आहे.