दापोली:ठाकरे घराण्याविरोधात बेताल वक्तव्य करणा-या शिंदे गटातील वादग्रस्त माजी मंत्री रामदास कदम यांचा मंगळवारी दापोलीतील शिवसैनिकांनी जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी रामदास कदम यांच्या बॅनरवरील प्रतिमेला जोडे मारण्यात आले.निम का पत्ता कडवा है,रामदास कदम भडवा है, गद्दार रामदास कदम मूर्दाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा ,अशा जोरदार घोषणा बाजी दापोलीतील शिवसैनिकांकडून करण्यात आली.दरम्यान रामदास कदम यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये,शिवसैनिकांचा उद्रेक झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषीकेश गुजर यांनी दिला.
रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे,आदित्य ठाकरे,रश्मी ठाकरे यांच्या विरोधात दापोली येथील सभेत बेताल वक्तव्य केले.त्याच्या निषेधार्थ दापोलीत शिवसैनिकांकडून हे आंदोलन छेडण्यात आले.महाराष्ट्रात गद्दारांचे सरकार आले आहे.त्या गद्दार गटातील रामदास कदम हा एक पिल्लू आहे.रामदास कदम सारख्या रड्याला ठाकरे घराण्याविरोधात बोलायला शोभत नाही.रामदास कदम यांनी अशांतता माजवण्याचा प्रयत्न करू नये,असे पुन्हा घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही,असा इशारा विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई यांनी दिला.
रामदास कदम यांनी स्वत: ला आवर घालावा,आम्ही शिवसैनिक कुणाला घाबरत नाहीत, हा प्रकार पुन्हा घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, शिवसैनिक शांत आहेत, त्यांना कुणी डिवचू नये,अन्यथा शिवसैनिकांचा उद्रेक होईल,असा इशारा दापोली शिवसेना शहरप्रमुख संदिप चव्हाण यांनी दिला.
या निषेध आंदोलनात दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषीकेश गुजर ,विधान सभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, दापोली शहर प्रमुख संदिप चव्हाण, उपजिल्हा महिला संघटिका मानसी विचारे,सह हजारों शिवसैनिक सहभागी झाले.दरम्यान या आंदोलनात शिंदे गटातील काही लोक आमने सामने आले.काहींनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला,त्यांना पोलिसांनी फरफटत बाहेर काढले व जमलेल्या शिंदे गटातील लोकांना पोलिसांनी दांडक्यांनी शहरातून हुसकावून लावले.