पाथरी(प्रतिनिधी)जिल्ह्यात जनावरां मधील लंम्पी आजारा च्या भितीने पशुधन पालक शेतकरी धास्तावले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात सरसगट जनावरांना लम्पीस्कीन प्रतिबंधक लस देण्यात यावी , अशी मागणी माजी जि.प. पशुसंवर्धन सभापती सौ . मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभरात सरसगट लम्पीस्कीन प्रतिबंधक लस देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहीती माजी सभापती मीराताई दादासाहेब टेंगसे यांनी दिली आहे.

     मागील काही दिवसापासून सर्वत्र जनावरांना लंम्पी स्कीन आजाराची लागण झालेली दिसून येत आहे. अनेक जनावरांना या आजाराची लागन झाल्याने पशुधन मृत्यूमुखी पडत आहेत.त्यामुळे सर्वसामान्यासह पशुधन पालक व शेतकऱ्यांतही काळजीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर माजी जि.प. सभापती सौ . मिराताई टेंगसे यांनी जिल्ह्यात सरसगट लम्पी स्कीन प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली होती.वास्तविक जिल्ह्यात जवळपास ३ लाख जनावरे असुन आतापर्यंत २ लाख लंम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे.अजूनही दिड लाख लस साठा शिल्लक आहे.लंम्पी आजाराचा प्रसार होण्यापूर्वीच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणावर भर द्यावा , अशी मागणी सौ.मीराताई टेंगसे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या आधिकाऱ्यांनी त्यांच्या संबधीत तालूका स्तरावरील यंत्रने ला तोंडी आदेश देऊन जिल्हाभरात सरसगट लसीकरण करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती माजी सभापती मीराताई टेंगसे यांनी दिली आहे.

      पशूपालक व शेतकऱ्यांमधून समाधान

दोन वर्षा पुर्वीही कोरोनाच्या सावटातच जिल्हाभरात जनावरांमध्ये लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराची लागन झाली होती. त्या मुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. यावेळी माजी सभापती मिराताई टेंगसे यांनी कोरोना काळातही गावोगावी जाऊन जनजागृती करून पशुपालक व शेतकऱ्यांना धीर दिला व हा आजार जिल्हयात झपाट्याने पसरू नये यासाठी प्रशासकिय स्तरावर प्रयत्नाची परिकाष्ठा करीत राज्यात लसचा तुटवडा असतानांही थेट लस उत्पादतीत कंपनीला संपर्क साधून सर्वाधिक परभणी जिल्हयाला लस उपलब्ध करुन घेत जिल्हयात ७५ टक्के जनावरांचे लसीकरण करून घेतले होते.परिणामी या लसीकरणामुळे आज इतर जिल्हयांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात जनावरे लम्पी स्कीन आजाराने कमी बाधीत झाल्याचे दिसुन येत आहे. या वर्षीही या आजाराने डोके वर काढले असुन हा आजार झपाट्याने पसरू नये यासाठी वेळीच उपाय योजना म्हणून जिल्हयात सरसगट लम्पी स्कीन प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश ही आले असुन संबधीत विभागाने त्यांच्या मागणीची दखल घेत सरसगट लसीकरण करण्याचे आश्वासन दिल्याने पशूपालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.