किसान सभा, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत ते सोडविण्याकरिता मोर्चे, आंदोलन, सोशल मीडियावरची व न्यायालयीन लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नवत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शेतकरी लढा अजून तीव्र करण्याची गरज असून त्यासाठी संघटन प्रबळ करणे अत्यावश्यक असते व त्याचाच भाग म्हणून किसान सभेने गाव पातळीवर जाऊन शाखा बांधणी चालू केली आहे. त्यातील वडवणी तालुक्यातील दुसरी शाखा मौजे राजा हरिश्चंद्र पिंपरी येथे २२ सप्टेंबर रोजी स्थापन करण्यात आली.

राजा हरिश्चंद्र पिंपरी हे गाव पूर्वापार लाल बावट्याचे गाव म्हणून ओळखले जाते, या ठिकाणी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून जगदीश फरताडे व इतर जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये शाखा पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड कण्यात आली.

या वेळी शाखा अध्यक्ष श्री. भागवत अच्युतराव शिंदे, सचिव म्हणून बाळकृष्ण मोकिंदा शिंदे, उपाध्यक्ष मोहन मधुकर शिंदे, रामप्रसाद बापूराव शिंदे, कृष्णा वैजनाथ शिंदे, सह सचिव म्हणून अमोल शिंदे, भागवत शिंदे, अशोक शिंदे तर सदस्य म्हणून श्री. उद्धव परमेश्वर शिंदे,श्री. जनार्धन सदाशिव शिंदे,श्री. पांडुरंग अर्जुन पवार,श्री. अंगद महादेव शिंदे,श्री. सुमेध सुदाम कांबळे ,श्री. चैतन्य ज्ञानेश्वर शिंदे,श्री. रवींद्र भारत शिंदे ,श्री. प्रवीण नारायण शिंदे ,श्री. कार्तिक ज्ञानोबा शिंदे ,श्री. संतोष बालासाहेब शिंदे ,श्री. विश्वंभर दत्तात्रय शिंदे ,श्री. मोहन ज्ञानेश्वर शिंदे,श्री. वैभव गंगाधर सोनवणे,श्री. ज्ञानेश्वर मोहन शिंदे,श्रीं. अमर तुकाराम शिंदे ,श्री. गोरख आसाराम शिंदे ,श्री. महादेव सुखदेव शिंदे ,श्री. सुदाम निवृत्ती शिंदे ,श्री. महादेव वैजिनाथ शिंदे ,श्री. कल्याण संपतराव शिंदे ,श्री. महारुद्र संपतराव शिंदे ,श्री. गोविंद रामराव शिंदे ,श्री. रामेश्वर अण्णासाहेब शिंदे ,श्री. कैलास श्रीराम शिंदे ,श्री. ज्ञानेश्वर त्रिंबक शिंदे ,श्री. विष्णू राधाकिसन शिंदे ,श्री. विठ्ठल बाबुराव शिंदे ,श्री. अमोल नारायण शिंदे ,श्री. संदीपान विठ्ठलराव शिंदे यांची पुढील एक वर्ष कालावधी करिता निवड करण्यात आली आहे

किसान सभेच्या वडवणी तालुका कमिटीने शेतकरी पुत्रांच्या ऐतिहासिक ट्रेंड नंतर आता प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहचत संघटन बांधणीची प्रक्रिया हातात घेतली असून शेतकरी एकजूट मजबूत करण्याकरिता या अनुषंगाने कार्यकर्ते गावोगावी जाऊन, वाडी, वस्ती, तांडा या ठिकाणी शेतकरी पुत्रांना एकत्र करून त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करून शाखा बांधण्याचे काम करत आहे, या करिता तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुढे येवून या मध्ये सामील होत आहे. 

 शाखा स्थापन करताना किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरीपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते, शाखा बांधणीकरिता माऊली आगे, गजानन शिंदे, ओम गिलबिले यांनी मेहनत घेतली, शाखेच्या सर्व नवं निर्वाचितांचे किसान सभेचे तालुका अध्यक्ष राजेभाऊ अण्णा बादाडे व तालुका सचिव डॉ. सावळाराम उबाळे, तालुका उपाध्यक्ष मुन्ना गोंडे, महादेव आगे व सदस्य अंकुश गोंडे आणि शुभम बादाडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.