शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधन कारक असताना बोगस घर दाखवून घर भाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा - गणेश शेवाळे 

पाटोदा (प्रतिनिधी) राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. तरी, तालुक्यातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड वाढत आहे. अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता आपआपल्या सुई नुसार ये-जा करतात. यामुळे कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नाहीत यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर सरकारी कार्यालयात यावा म्हणून थंब मशीन बसवण्यात यावी यामुळे सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही जे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी पञकार संघाचे पाटोदा तालुकाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री,महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,पाटोदा येथील शासकीय,निमशासकीय, कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले होते, परंतु वर्ग-१ व वर्ग-२, वर्ग -३चे अधिकारी व इतर कर्मचारी यांनी शासनाच्या आदेशाचे तीन-तेरा वाजलेले आहेत. आदेशाला न जुमानता जिल्ह्याच्या किंवा इतर जिल्हा ठिकाणा वरून कर्मचारी ये-जा करतात. जे अधिकारी कर्मचारी मुख्यालयी न राहता घर भाडे घेतात अशा बनवाबनवी करणाऱ्या कर्मचारी,अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून ग्रामसेवक,शिक्षक, तलाठी,डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,विद्युत कर्मचारी मुक्कामी राहात नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पुरोगामी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिली असून जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई केली नाहीतर मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा दारात अमरण उपोषण करु असा इशारा गणेश शेवाळे यांनी दिला आहे