सोलापुर :- अक्कलकोट शहरातील डबरे गल्लीतील एका जेष्ठ महिलेस एका अनोळखी व्यक्तीने मारुतीला प्रसाद द्यायचा बहाणा करून 60 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. 

बुधवारी भरदुपारी बारा वाजता महिलेच्या घराजवळ ही घटना घडली आहे .

या बाबत उत्तर पोलीस ठाण्यात सुमारे पंचवीस वर्षीय अज्ञात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद निर्मला वसंत चव्हाण राहणार डमरे गल्ली अक्कलकोट यांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे करीत आहे.