औरंगाबाद :वाळूज परिसरात दोन महिन्यांत डेंग्यू , कावीळ , मलेरियाने ८ रुग्ण दगावले आहेत . मात्र , शासनदरबारी केवळ ३ रुग्ण दगावल्याची नोंद आहे . तसेच , विविध खासगी रुग्णालयांत ६७ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत . परंतु , आरोग्य विभागाकडे चार रुग्णांची नोंद आहे . त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे . हाताबाहेर जाणाऱ्या या परिस्थितीचे गांभीर्य आरोग्य विभाग , स्थानिक ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणेने लक्षात घेण्याची गरज आहे . अन्यथा मृत्यूचा वाढता आकडा कमी करणे शक्य होणार नाही , अशी चिंता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे . दोन दिवसांपूर्वीच कावीळ व डेंग्यूसदृश आजाराने बजाजनगरातील खासगी शाळेतील दहावीच्या वर्गातील मुलीचा मृत्यू झाला . लग्नानंतर १३ वर्षांनी जन्माला आलेल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला . यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने दौलताबाद आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या बजाजनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली . त्यावेळी असे निदर्शनास आले की , दोन महिन्यांत डेंग्यूने ३ रुग्णांचा मृत्यू झाला , तर अन्य चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પ્રમુખ નગર માં ખાસ વાતચીત @live24newsgujarat
પ્રમુખ નગર માં ખાસ વાતચીત @live24newsgujarat
रायमोहा येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी@india report
रायमोहा येथे संत सेना महाराज यांची जयंती साजरी@india report
হাঁহচৰাত আজাদী কা অমৃত মহোৎসৱ
ভাৰতবৰ্ষৰ ৭৫ সংখ্যক স্বাধীনতা দিৱসৰ লগত সংগতি ৰাখি "আজাদী কা অমৃত মহোৎসৱ" উপলক্ষ্যে আজি হাঁহচৰা...
ગુજરાત પોરબંદર બંધના એલાનમાં જોડાવા PC યોજી કોંગ્રેસના અર્જુનભાઈ મોઢવાડિયા એ લોકોને અપીલ કરી
ગુજરાત પોરબંદર બંધના એલાનમાં જોડાવા PC યોજી કોંગ્રેસના અર્જુનભાઈ મોઢવાડિયા એ લોકોને અપીલ કરી
आनंद फाउंडेशन तर्फे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचा सत्कार
आनंद फाउंडेशन तर्फे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचा सत्कार
पाचोड विजय...