सोलापुर - भरधाव वेगाने धडक देवून 70 हजार रूपयाचा नुकसान केल्याचे आरोपातून आरोपी अकबर बाशा पीरजादे (वय-३९ वर्ष, अक्कलकडे रोड, सोलापूर) याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एम. काकडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, फौजदार चावडी पोलीस स्टे. येथे दि.10/10/16 रोजी फिर्यादीने आरोपी अकबर बाशा पिरजादे याचा वर गुन्हा नोंद केला होता. सदरचा गुन्हा हा भा.द.वि. कलम 279, 427 प्रमाणे नोंदवण्यात आला होता. फिर्यादीप्रमाणे दि. 8/10/16 रोजी सकाळी जुना पुनानाका या ठिकाणी फिर्यादी चार चाकी वाहना मधुन सोलापुरकडे येत असताना आरोपी अकबर बाशा पिरजादे याने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहनाने पाठीमागुन भारधाव वेगाने येवुन धडक देऊन फिर्यादीचा गाडीचे 70 हजार रुपयाचे नुकसान केले अशी अश्याची फिर्याद देण्यात आली होती. त्याच्या तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

 त्याप्रमाणे सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले त्या साक्षीदारांच्या जबाबातील तफावती तसेच आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील समीर माशाळे यांनी न्यायालयासमोर मांडला होता त्या युक्तिवादास ग्रहाय धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे.

यात आरोपी तर्फे ॲड.समीर माशाळे, ॲड.मुंजरीन शेख-माशाळे यांनी काम पाहिले.