जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !

सोलापूर - शहरात शेकडो झोपडपट्टया आहेत.यांना पक्के घर नाही, त्याठिकाणी मलनिस्सारण व्यवस्था नाही,लोक दाटीवाटीने राहतात, तुटपुंजी जागा अशी वस्तुस्थिती आहे या लोकांना सार्वजनिक नळाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले आते. या कष्टकरी लोकांचा सांगोपांग विचार न करता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक आहे. याच्या विरोधात सर्व जनता एक होणे अत्यंत गरजेचे आहे वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिके मार्फत अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत यामध्ये पुन्हा नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी भविष्यात संघर्षाची धार आणखी तेज करावी लागणार आहे आपल्यासमोर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तेव्हा या निवडणुकीला सामोरे जात असताना महापालिकेच्या सभागृहात जनतेच्या प्रश्नावर ज्यांनी आवाज उठविला अशा लढाऊ नगरसेवकांनाच नगरसेवक म्हणून पाठवण्याची जबाबदारी एक जागरूक नागरिक या नाते आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन मा.नगरसेविका कामीनीताई आडम यांनी व्यक्त केले.

बुधवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बापूजी नगर सभागृह येथे जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष कुरमय्या म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

  

यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, बापूजी नगर,लष्कर,मोदी,इरन्ना वस्ती याभागात मोची समाज बांधव मोठ्या संख्येने राहतात.अत्यंत दारिद्र्यात जगणाऱ्या यांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी सिटू च्या नेतृत्वाखाली आजही लढा चालूच आहे. मातीत मळलेल्या,रमलेल्या या समाजाच्या बांधवांसाठी हक्काचे घर देण्याचा विडा लाल झेंड्याने घेतलेला आहे. तो पूर्ण होईपर्यंत लढाई चालूच राहणार आहे. अशा शब्दांत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

युसुफ शेख मेजर, रंगप्पा मरेड्डी, मनोगत व्यक्त केले. 

सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.यांनी मार्गदर्शन केले. 

प्रास्तविक मारेप्पा फांदीलोळू यांनी केले.  

यावेळी व्यासपीठावर देविदास कुमार, मिनाक्षीताई चलवादी,लक्ष्मण भंडारे व संचालक मंडळ उपस्थित होते. 

या सभेची सुरुवात मोची समाजाचे कुलदैवत जांबमुनी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

संस्थेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.  

 कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले. 

सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी मोहन कोक्कुल, सुनील आमाटी,नागनाथ म्हेत्रे,श्रीनिवास गोंन्याल, गोविंद सज्जन,डेव्हिड शेट्टी,कुरमेश म्हेत्रे,भारती म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.