आज शहरातील पेठ बीड भागातील चांदणी चौक परिसरात असणाऱ्या चर्मकार बांधवांच्या समाज मंदिरात बीड जिल्हा कोशिकी असोसिएशनच्या वतीने बेल्ट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी उपस्थित राहून नव कराटेपटूना बेल्टचे वाटप केले. याप्रसंगी बोलतांना सांगितले की, कराटे हा खेळ साहसी खेळात मोडला जातो. आपल्याकडे आता या खेळाला प्रतिसाद मिळत असून पालकांचा देखील याकडे आता कल वाढलेला आहे.

माझे लहान चिरंजीव युगंधर हा देखील तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. आत्मसंरक्षणासाठी हे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांची आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. त्यास योग्य आहार व योग्य झोप मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात कोशिकी असोसिएशनला सर्वोत्परी सहकार्य करू असे सांगितले.

यावेळी मा.नगरसेवक सतिश (आप्पा) पवार, शुभम धुत, कोशिकी असोसिशनचे सचिव महंमद, मझहर, आमेर सिद्दीकी, अमर विद्यागर, ऋषभ वाघमारे, नबिल जमा, साजेद जागिरदार, इकबाल भाऊ, समीर सरकार, सालेहा मॅडम, वाजेद कुरेशी, समीर खान, अभिजित आव्हाड, डॉ.शेख शकील आदी उपस्थित होते.