घंटा गाडीला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला जालना : नगरपालिकेच्या प्रांगणातील पार्कींग झोनमध्ये उभ्या असलेल्या छोट्या हत्ती वाहनाला आग लागल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.पालिकेचे कर्मचारी संदिप वानखेडे यांच्या सदरील बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास माहिती दिली. दरम्यान अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.आग लागलेल्या वाहनाच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या वाहनाला सुध्दा आग लागण्यास सुरवात झाली होती. परंतू अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून तात्काळ आग विझवल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या गाड्यांना आगीपासून वाचवण्यात यश आले.वायरिंगची स्पार्कींग होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सगट,राहूल नरवडे,बाबू गवळी,जॉन, विठ्ठल कांबळे ई. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले