महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने ची माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन जाधवकन्नड :महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१ ९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना . संदर्भ : - महाराष्ट्र शासन , सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग , शासन निर्णय क्रमांक प्रोअयो ०६२२ / प्र.क्र .७२ / २ - स . दिनांक २ ९ जुलै २०२२ . उपरोक्त विषयाचे अवलोकन करावे . २ / - उक्त विषयास अनुसरुन संदर्भीय शासन निर्णयान्वये शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१ ९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेस राज्यातील पुर्णतः कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्याच्या योजनेस या शासन निर्णयातील नमुद अटीस अनुसरुन मान्यता दिलेली आहे . त्यानुसार सहकारी संस्थेचे गटसचिव व बँकेचे शाखाधिकारी यांनी एकत्रीत पणे पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली आहे . तथापी दिनांक १ ९ .० ९ .२०२२ रोजी मा.श्री . हर्षवर्धन जाधव , माजी विधानसभा सदस्य यांनी या कार्यालयास भेट देऊन विनंती केली कि , संदर्भीय शासन निर्णयातील नमुद अटी व शर्तीचे पालन न करता सदर डाटा पोर्टलवर अपलोड केलेला आहे . त्यामुळे तालुक्यातील बरेच शेतकरी प्रोत्साहन पर लाभापासुन वंचीत राहिलेले आहे . संदर्भीय शासन निर्णयातील नमुद अटीनुसार नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८ , सन २०१८-१९ आणि , सन २०१ ९ -२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थीक वर्षा पको कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करुन नियमीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यांत आली आहे