औरंगाबाद:- (दीपक परेराव)अनु.जाती,जमाती,विजाभज, इ.मा.व, वि.मा.प्र. शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटना मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-३२ या संघटनेमार्फत रामदास मगरे अध्यक्ष मराठवाडा प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली मनपा मा.आयुक्त,औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यांचे प्रथमः पुष्पगुच्छ शॉल व भारतीय संविधान पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आयुक्तांना कामगारांच्या विविध विषयांवरील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.अन्याय अत्याचार झालेले कर्मचारी व विविध विभागातील कंत्राटी कामगार यांच्या विविध विषयांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.महानगरपालिकेतील काही अधिकारी कर्मचारी कामगारांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करतात काम समाधानकारक करत नाही यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे सुचित करण्यात आले.

यावर निवेदनाद्वारे मागणीही करण्यात आली लवकरात लवकर संघटनेला बैठकीसाठी पाचारण करून मागण्या तातडीने सोडवण्यासाठी उपाय योजना करण्यात येईल आसे आश्वासन मा. आयुक्त मनपा यांनी दिले.

 यावेळी संघटनेच्या वतीने रामदास मगरे अध्यक्ष मराठवाडा प्रदेश,अशोक औवचरमल उपाध्यक्ष मराठवाडा प्रदेश, एच.डी हटकर मॅडम महासचिव, मराठवाडा प्रदेश, दशरथ भातपुडे अध्यक्ष औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद, संजय दाभाडे जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद, आर. एस पवार, दीपक गाडेकर, व शेलार साहेब यांची यांची संघटनेच्या वतीने प्रामुख्याने उपस्थिती होती.