शिक्रापुरात मैत्रिणीकडे आलेल्या महिलेचा विनयभंग
महिलेचे बदनामीकारक फोटो बनवून सोसायटी खाली फेकले
( तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे मैत्रिणीकडे आलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून महिलेचा विनयभंग करुन महिलेची बदनामी करण्याच्या हेतूने महिलेचे अश्लील फोटो व मजकूर बनवून महिलेचे फोटो महिला राहत असलेल्या पुणे येथील सोसायटीच्या बाहेर चिटकवत सोसायटीच्या खाली टाकून दिल्याची घटना घडली असल्याने सुर्यकांत चंद्रकांत शिर्के या फोटोग्राफर युवकावर गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एका मैत्रिणीकडे पिडीत महिला आलेली असताना महिलेचा पती फोटोग्राफर असलेला सुर्यकांत शिर्के याने महिलेचे अश्लील स्वरूपातील फोटो काढले त्यांनतर महिलेला फोन करुन तू मला भेट नाहीतर तुझे कपडे बदलतानाचे फोटो मी सोशल मिडीयावर प्रसारित करेल अशी धमकी दिली, दरम्यान महिला त्याला भेटली त्याने मला तू त्रास देऊ नकोस असे सांगितले असता त्याने महिलेचा हात पकडत विनयभंग केला मात्र बदनामी नको म्हणून सदर महिलेले घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले नाही, मात्र सुर्यकांत हा वारंवार महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, त्यामुळे महिलेच्या आई, वडिलांसह भावाने सुर्यकांत याला समजावून सांगितले तसेच महिलेने त्याचे मोबाईल नंबर ब्लॉक करुन टाकले, त्यांनतर सुर्यकांत याने पोस्टर बनवून त्यात महिलेच्या फोटोवर महिलेबाबत अश्लील मजकूर व मोबाईल नंबर टाकून महिला राहत असलेल्या सोसायटीचे खाली टाकत काही दुकानावर चीटकवले, त्यावेळी महिलेच्या कुटुंबीयांनी सोसायटी समोरील सीसीटीव्ही फुटेल तपासले असता त्यामध्ये सुर्यकांत शिर्के हा रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी महिलेची बदनामी करणारे पोस्टर चिटकवताना व टाकून देताना दिसून आला, त्यामुळे पिडीत महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे धाव घेतघडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली असल्याने कोंढवा पोलिसांनी शिक्रापूर येथील फोटोग्राफर सुर्यकांत चंद्रकांत शिर्के रा. हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध विनयभंगासह आदी गुन्हे दाखल केले असून कोंढवा पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग केल्याने सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर हे करत आहे.