पाचोड केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप...

पाचोड/ प्रतिनिधी, पाचोड ता.पैठण येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील  पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वा शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये सर्व मुली, एस.सी, एस.टी ,बीपीएल मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवराज भुमरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल भुमरे ,उपाध्यक्ष अमोल शिंदे, सदस्य आप्पासाहेब भुमरे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे, कुणाल नरवडे बळीराम नरवडे ,शिक्षक बाळासाहेब घाडगे, आसाराम तांदळे ,अनिता फुंदे ,ज्योती आष्टीकर, कांचन पांचाळ , जगन नरवडेसह विद्यार्थी उपस्थित होते.